काॅर्न सँन्डविच रोल बनविण्यासाठी-
साहित्य:
- ८ ब्रेड स्लाईस
- १/२ कप मका
- १/४ कप क्रीम चीज
- १ किंवा २ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- बटर
कृती:
- ब्रेडच्या कडा कापून लाटण्याने ब्रेड स्लाईस लाटून घ्या
- त्याच्या एका बाजूला थोडेसे बटर लावा.
- मक्याचे दाणे वाफवून घेऊन खडबडीत वाटून घ्या.
- बारीक चिरलेली हिरवी मिरची,कोथिंबीर, मका, क्रीम चीज सर्व एकजीव करा.
- ब्रेडच्या बटर न लावलेल्या भागावर हे मिश्रण पसरा व रोल करा.
- टोस्टरमध्ये हे रोल टोस्ट/ग्रील करून घ्या.
- वरुन बटर लावून साॅस किंवा चटणीसोबत खायला द्या.