थंडाई मसाला कुकीज
साहित्य॒: ६० ग्रॅम बडीशेप, ११० ग्रॅम साखर, ५ ग्रॅम मिरी, ८० ग्रॅम बदाम, ३० ग्रॅम पिस्ता, ३० ग्रॅम मगज, ५ ग्रॅम वेलची, १० ग्रॅम खसखस.
कृती॒: प्रथम मिक्सरमध्ये बडीशेप, मिरी व वीस ग्रॅम साखर घालून वाटून घ्या. ही पूड चाळणीतून चाळून बाऊलमध्ये काढा. आता उरलेली साखर, बदाम, पिस्ता, मगज, वेलची, खसखस मिक्सरमध्ये घालून बारीक वाटा. ही पावडर वरील पावडरमध्ये मिक्स करा. थंडाई पावडर तयार. ही पावडर थंडाई, गोड पदार्थांमध्ये वापरता येईल.
कुकीजसाठी साहित्य॒: १०० ग्रॅम गव्हाचे पीठ, ८० ग्रॅम ओट्स, ५० ग्रॅम थंडाई, ५० ग्रॅम लोणी, ६० ग्रॅम पिठी साखर, दूध आवश्यकतेनुसार, १/२ किलो जाड मीठ, थोडे बदाम.
कृती॒: प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात जाड मीठ घाला. कढई गरम होते तोपर्यंत बाऊलमध्ये लोणी व पिठी साखर घालून हाताने चांगले पाच मिनिटे मिक्स करा. हे मिश्रण पांढरे झाल्यावर त्यात थोडे थोडे करून चाळलेले गव्हाचे पीठ, भाजलेल्या ओट्सची पावडर व थंडाई घालून मिक्स करा. थोडे थोडे दूध घालून गोळे बनतील असे मळा. गोळे करून हाताने थोडा दाब द्या. त्यावर बदाम किंवा चॉकलेट बॉल लावा. तुपाने ग्रीस केलेल्या थाळीवर थोड्या थोड्या अंतरावर हे बॉल्स ठेवा. कढईत जाळी ठेवून त्यावर ही थाळी ठेवा. झाकण ठेवून वीस मिनिटे मंदाग्नीवर ठेवा. हवे असल्यास पाच मिनिटे पुन्हा ठेवा. काढून सर्व्ह करा. वरून थंडाई पावडर भुरभुरा.
टीप: उन्हाळ्यात चहाबरोबर खाण्या-साठी उत्तम व पौष्टिक कुकीज आहेत.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्रतीक माने, मुंबई