साहित्यः
- १० कंटोळी
- १ वाटी किसलेले ओले खोबरे
- १/२ वाटी पनीर
- १/२ वाटी मावा
- २ हिरवी मिरची, कोथिंबीर
- आलं
- तांदळाचे पीठ
- कुरकुरीत नायलॉन शेव
- चाट मसाला
- मीठ
श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.
कृतीः
- कंटोळीला देठाकडे कापून मीठ घातलेल्या पाण्यात उकळवावे.
- नंतर गाळून घ्यावे व आतील बिया अलगद काढाव्या.
- नंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं एकत्रित करुन मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
- त्यात ओले खोबरे, पनीर, मावा, मिरची-कोथिंबीरीचे वाटण, चाट मसाला, चवीपुरते मीठ घालून एकत्रित करावे.
- हे सारण हलक्या हाताने कंटोळीत भरावे.
- तांदळाच्या पीठात पाणी व थोडेसे मीठ घालून भजीच्या पीठाप्रमाणे भिजवावे.
- भरलेली कंटोळी त्यात बुडवून शेवात लपेटून तेलात डीप फ्राय करावे.
- वरुन शेव लावल्यामुळे कंटोळी तळल्यानंतर खुशखुशीत होतात.