गव्हले भात बनवण्यासाठी –
साहित्य:
- १ वाटी गव्हले
- १ वाटी साखर
- १ वाटी आंब्याचा रस
- १ वाटी खवलेला नारळ
- ४ चमचे साजूक तूप
- १ वाटी पाणी
- सजावटीसाठी काजू, बदाम, बेदाणे
- १/४ वेलची पावडर
कृती:
- प्रथम गव्हले तुपात चांगले भाजून घ्या. उकळून आलेल्या एक वाटी पाण्यात हे गव्हले मोकळेच शिजवून घ्या व थंड करत ठेवा.
- नंतर दुसऱ्या पातेल्यात साखर व आंब्याचा रस एकत्र करून साखर विरघळल्यावर त्यात खवलेला नारळ घाला.
- घट्ट होत आल्यावर त्यात शिजवलेले गव्हले घाला व चांगले ढवळून दोन वाफा येऊ द्या.
- नंतर त्यात साजूक तूप व वेलची पावडर, काजू, बदाम, बेदाणे घाला व परत एक वाफ येऊ द्या.
- नंतर मूद पाडून व काजू, बदाम, बेदाणे यांनी सजवून खाण्यास द्या. चवीला गव्हले भात खूप छान लागतो.