गावा
साहित्य : ७–८ पेरू, ३ छोटे चमचे मध, २ छोटे चमचे लिंबाचा रस, चवीनुसार लाल मिरची पावडर आणि काळे मीठ, ७–८ पुदिन्याची पाने सजावटीकरिता.
कृती : प्रथम पेरू(गावा) स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याचे चौकोनी काप करावेत. पेरूचे काप गॅसवर गरम पाण्यात ८–१० मिनिटांकरिता शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर शिजवलेले पेरू व थोडे पाणी घालून ब्लेंडरमधून ज्यूस करून घ्यावा. गाळणीने तो गाळून घ्यावा. ज्यूसच्या जारमध्ये पेरूचा ज्यूस, मध, लाल मिरची पावडर व काळे मीठ घालून एकत्र ढवळून घ्यावे. फ्रिजमध्ये थंड करायला ठेवावे. पुदिन्याची पाने घालून थंडगार ज्यूस सर्व्ह करावा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.