गोल्डन सूप बनविण्यासाठी –
साहित्य:
- १ कप लाल भोपळ्याचे तुकडे
- १/२ कप दुधी भोपळ्याचे तुकडे
- १ छोटा बटाटा
- ३-४ पाकळ्या लसूण
- १/२ (लहान) कांदा
- १/२ कप दूध
- १/३ कप शेंगदाणे
- चिमूटभर जायफळ
- पूड
- काळी मिरी पूड
- मीठ
- बटर
- लोणी
कृती:
- लाल भोपळा, दुधी भोपळा, बटाट्याची साले काढून बारीक चिरा.
- कांदा चिरुन घ्या.
- भांड्यात एक टीस्पून तेल घालून त्यात कांदा पारदर्शक होईपर्यंत परता.
- त्यात भाज्यांचे तुकडे, लसून घालून थोडेसे पाणी घालून शिजवा.
- थंड झाल्यावर मिक्सरमध्ये प्युरी करुन घ्या.
- भांड्यात काढून त्यात दूध घाला.
- सूप दाट वाटल्यास थोडे आणखी दूध घाला व मंदाग्नीवर ठेवा.
- चवीनुसार मीठ, जायफळ पूड, काळी मिरी पूड घाला.
- दुसऱ्या भांड्यात बटर घालून त्यात साले काढलेले शेंगदाणे परतून घ्या.
- खडबडीत कुटा.
- सूप सर्व्ह करताना वरुन शेंगदाणे घाला.
- सूप तिखट हवे असल्यास भाज्यांसोबत एखादी हिरवी मिरची घाला.