चिकन श्वर्मा

Published by कालनिर्णय स्वादिष्ट | डिसेंबर २०१६ on   December 29, 2017 in   Food Corner

चिकन श्वर्मा बनविण्यासाठी-

साहित्य:

  • चिकन थाईज (हाडे काढून टाकलेली)
  • २ टीस्पून तंदूर मसाला
  • २ टीस्पून आल्याचे वाटण
  • १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  • १ टीस्पून काळी मिरीपूड
  • १ टीस्पून लसूणपेस्ट/वाटण
  • १ लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ

कृती:

  1. शक्यतो हाडे काढून चिकनच्या मांडीकडचा भाग घ्यावा अथवा चिकन ब्रेस्ट वापरावे.
  2. चिकनचे दोन भाग करावे. (एक मसालेदार तर एक कमी तिखट बनविण्यासाठी)
  3. एका भागात तंदूर मसाला,आले वाटण,लाल तिखट,लसूण पेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करावा.
  4. दुसऱ्या भागात मीठ, काळी मिरीपूड, आल्याचे वाटण, लसूणपूड आणि लिंबाचा रस टाकून एकत्र करावे.
  5. चिकनला चरबी कमी प्रमाणत असेल तर १-२ टीस्पून तेल टाकावे.
  6. दोन्ही चिकन फ्रीजमध्ये किमान दोन तास तरी मुरत ठेवावे.
  7. ओव्हन २०० C वर १० मिनिटे तापवून घेतल्यानंतर हे दोन्ही स्टँड आत ठेवून अर्धा तास भाजून घ्यावे.
  8. पिटा ब्रेड/खुबुस अर्धा उघडून त्यात वरील मिश्रण भरून घ्यावे.
  9. रोल करुन गरमगरमच सर्व्ह करावे.

  – कालनिर्णय स्वादिष्ट | डिसेंबर २०१६