ज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक बनविण्यासाठी
साहित्य:
१. केकसाठी:
- १ १/२ कप ज्वारीचे पीठ
- एक कप गव्हाचे पीठ
- १/२ कप काॅर्नस्टार्च
- एक कप पालक पेस्ट
- ३/४ कप सनफ्लोवर तेल
- १ ते १ १/२ कप दही
- एक किवा १/२ कप गुळाची पावडर
- १ छोटा चमचा खायचा सोडा
२. बीटाचा जॅम
- ३ मध्यम आकाराचे बोट
- ३ मध्यम केळी
- १ १/२ कप साखर / गूळ ( पावडर )
- २ चमचे लिंबाचा रस
- १/२ चमचा अगर- अगर
याशिवाय,
- बदाम भाजून त्याचे पातळ काप
- किसलेले व्हाइट चाॅकलेट
- किसलेले डार्क चाॅकलेट
कृती:
- प्रथम दही, मिल्क पावडर व गूळ मिक्सरच्या भांड्यात घालून फेटा. नंतर त्यात तेल घालून फेटा. पालकाची पाने गरम पाण्यात टाकून त्याची प्युरी कारून घ्या व ती प्युरी वरील मिश्रणात घालून फेटा. यात खायचा सोडा घालून दहा मिनिटे तसेच ठेवा. ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ काॅर्नस्टार्च एकत्र चाळून घ्या. ओव्हन १८०° वर प्रीहिट करा. पालक- दही मिश्रण व पीठाचे मिश्रण एकत्र करून चमच्याने एकाच दिशेने फेटा. घट्टसर वाटल्यास थोडे दही घालून पुन्हा फेटा. नंतर हे मिश्रण ब्रेड मोल्डमध्ये ओतून १८०° वर पंचेचाळीस मिनिटे केक बेक करून घ्या
- बीटाचा जॅम करण्यासाठी बीट उकडून गार झाल्यावर त्याची प्युरी करा. त्यात केळे कुस्करून घाला. नंतर त्यात साखर / गूळ घालून हे मिश्रण उकळून घ्या. एक कप पाण्यात अगर- अगर विरघळवून त्या मिश्रणात घाला व थोडे घट्टसर झाले कि झाकण ठेवा. मागच्या बाजूने कोटिंग आले कि गॅस बंद करा.
- सॅण्डविच करण्यासाठी केकचे स्लाईस करून घ्या. त्यासाठी केक आधी पूर्णपणे थंड करून घ्या. एका स्लाईसला बीटचा जॅम लावून त्यावर बदामाचे काप घालून त्यावर दुसरा स्लाईस ठेवून त्रिकोणी कप व त्यावर व्हाइट किंवा डार्क चाॅकलेट किसून घ्या.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अदिती पाध्ये
One thought on “ज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक ( फ्युजन रेसिपी ) – अदिती पाध्ये”