साहित्य :
- ९ ते १० विडयाची पाने
- २ वाटी नारळाचा चव
- सव्वा वाटी साखर
- ३ चमचे पानाचा मसाला (बडीशेप, थंडाई (चिमुटभर)
- गुंजेचा पाला
- टुटीफ्रुटी
- गुलकंद
- खजुराचे काप
- सुक्या खोबऱ्याचा कीस
- मिल्क पावडर २ चमचे
कृती :
- पानाची देठे व शीरा काढा.
- वाटलेली पाने, नारळाचा चव, साखर, २ चमचे मिल्क पावडर घालून मिक्सरमधून काढा.
- हे मिश्रण कडा सुटेपर्यंत पॅनमध्ये शिजवा.
- थाळीला किंवा विडयाच्या पानावर तूपाचा हात फिरवून मिश्रण पसरवा.
- मध्ये पानाचा सर्व मसाला पसरुन परत बर्फीचे मिश्रण पसरुन सेट होईपर्यंत ठेवा.
- वरती कोको पावडर, साखर, खोबर परतून त्याची सुपारी बनवा.
- बर्फी सेट झाल्यावर पान काढा.
- त्यावर सुंदर पानाच्या रेषा उमटल्या असतील.
*करायला सोपी, सुटसुटीत, चवदार आणि हटके रेसीपी सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारळ आणि पान यांचे उत्कृष्ट कॉम्बिनेशन जे श्रावण महिन्यात अत्यंत शुभ.