साहित्य: ( १३ ते १४ दिंड्यांसाठी )
- चणाडाळ – २ वाट्या
- गूळ – २ वाट्या
- वेलची आणि जायफळ पूड (आवश्यकतेनुसार)
- कणीक – २ वाट्या
- पाणी
- साजूक तूप
श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.
कृती:
- २ वाट्या चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या.
- त्यात २ वाटी गूळ घालून पुरण घट्ट होईपर्यंत आटवून घेणे.
- वेलची व जायफळ पूड घ्यावी.
- पुरण थंड होत ठेऊन द्या.
- कणीक नेहमीपेक्षा थोडी घट्ट भिजवावी व त्याची मोठी पुरी लाटावी.
- पुरीत पुरण भरून चारी बाजूंनी दुमडावी.
- तयार दिंडा चाळणीत ठेऊन २० मि. गॅसवर वाफवून घ्या.
- साजूक तूपाबरोबर गरमागरम सर्व्ह करा.