नारळाच्या दुधातील मोदक बनविण्यासाठी –
साहित्य:
- तांदळाची पिठी
- पाणी प्रत्येकी १ वाटी
- नारळाचे दूध अर्धी वाटी
- मीठ चवीपुरते
- भाजलेल्या खसखशीची पूड – २ चमचे
- पाव वाटी साखर
- अर्धी वाटी खवा
कृती:
- एका नारळाचा चव घेऊन त्यात कोमट पाणी घालून दूध काढून घ्यावे.
- उरलेला चव जितका भरेल त्याच्या निम्मा गूळ घ्या.
- त्यात पाव वाटी साखर, अर्धी वाटी खवा, खसखसपूड व नारळ दूध घालून सारण बनवा.
- तांदळाच्या पिठीची उकड काढून त्यात सारण भरुन मोदक तयार करा, उकडून घ्या.
– कालनिर्णय रेसिपीज | कालनिर्णय स्वादिष्ट
Pingback: उपवासाची रेसिपी | केळवली | Kalnirnay 2019 | स्वादिष्ट २०१९ ऑगस्ट