नारळी भात

Published by Kalnirnay Special Recipes 2017 on   August 6, 2017 in   Food Corner

साहित्यः


  • तांदूळ २ वाटया
  • बारीक चिरलेला गूळ ३ वाटया
  • एका नारळाचा चव
  • भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी
  • वेलदोडे ३-४
  • मीठ पाव चमचा
  • लवंगा
  • तूप
  • दुधात भिजवलेले केशर

कृतीः


  1. एक पळी तुपावर लवंगा फोडणीला टाका.
  2. तांदूळ परतून घ्या.
  3. तांदळाच्या दुप्पट पाणी घालून मोकळा भात करा.
  4. वाफ जिरल्यावर परातीत काढा.
  5. गरम आहे तोवरच त्यात नारळाचा चव, किसलेला गूळ कालवा.
  6. मोठया पातेल्यात १ पळी तूप घालून सोललेले दाणे परता.
  7. त्यात परातीतला भात, वेलची पूड घाला.
  8. मंद आचेवर ठेवा. वरुन दुधात भिजवलेले केशर घाला.

टीपः  हा भात निवल्यावरच छान लागतो.