फ्रूट पाणीपुरी शॉट्स
पुरीसाठी साहित्य: १/२ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी कापलेली फळे (कोणतीही), १ मोठा ग्लास ज्यूस (पेरू, कलिंगड, द्राक्षे, सफरचंद, केळे, अननस, डाळिंब, संत्री व स्ट्रॉबेरी यापैकी कोणत्याही फळाचा किंवा मिक्स फ्रूट), ७-८ पुदिन्याची पाने, आवश्यकतेनुसार लिंबाचा रस तसेच जिरेपूड-मिरेपूड-सैंधव मीठ, तळण्यासाठी तेल.
सजावटीसाठी: सर्व्हिंग ग्लास, काजू-बदाम, चारोळी, मगज बी, खारीक पावडर, पुदिन्याची पाने.
कृती: सर्वप्रथम गव्हाचे पीठ मळून पोळी लाटून घ्या. पाणीपुरी सारख्या पुऱ्या तयार करा. पुऱ्या तळून घ्या. एका भांड्यात कापलेली फळे, चवीनुसार सैंधव मीठ, लिंबाचा रस, मिरेपूड, पुदिन्याची पाने घालून मिश्रण एकजीव करा. फळांच्या ज्यूसमध्ये सैंधव मीठ, मिरेपूड व जिरेपूड घाला. सर्व्हिंग ग्लासमध्ये फळांचा ज्यूस, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस घाला. तयार पुरीमध्ये फळांचे मिश्रण भरा. सर्व्हिंग ग्लासवर तयार पुरी ठेवून काजू-बदाम, चारोळी, मगज बी, खारीक पावडर व पुदिन्याच्या पानांनी सजवा.
(टीप:ज्यूससाठी वापरलेली फळे पुरीच्या सारणात वापरू शकता.)
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– प्रीती साळवी, कोपर, डोंबिवली (प.)