पारंपारिक मोदक – कालनिर्णय स्वादिष्ट २०१७

Published by कालनिर्णय स्वादिष्ट २०१७ on   August 24, 2017 in   Food Corner

पारंपारिक मोदक


साहित्यः

  • ३ वाटया तांदळाची पिठी
  • २ चमचे तेल
  • अर्धा चमचा मीठ.
  • सारणासाठीः
  • १ मोठा नारळ
  • १ वाटी साखर किंवा गूळ
  • १० वेलदोडयाची पूड
  • आवडत असल्यास बेदाणे
  • २ चमचे खसखस.

पूर्वतयारीः

  • नारळाचा चव, गूळ घालून चांगला शिजवणे.
  • त्यात वेलदोडयांची पूड घालणे.
  • तसेच बेदाणा, खसखस घालून चांगले ढवळणे व गार करण्यास ठेवणे.

कालनिर्णय मंगलमूर्ती आरास(घरगुती) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा व उत्कृष्ट भेटवस्तू जिंका! 

कृतीः

  1. साधारण जेवढी पिठी असेल तेवढेच पाणी घेणे.
  2. त्यात मीठ व तेल घालणे.
  3. पाणी उकळू लागले की त्यात तांदळाची पिठी घालणे.
  4. खाली (गॅसवरुन उतरवून) खूप ढवळणे व परत गॅसवर ठेवून त्यास चांगली वाफ आणणे. (अशा एक-दोन वाफा आल्यावर पीठ चांगले शिजते.)
  5. मग गरम गरम उकड तेलाचा हात घेऊन परातीत मळणे.
  6. पीठ चांगले मऊ झाल्यावर त्याची हाताने लहानशी पारी करणे (गोल करणे).
  7. मग सर्व बाजूने, त्या पारीला चिमटे घेत घेत गोल करणे.
  8. त्यात वरील सारण भरणे व पारीचे तोंड बंद करणे.
  9. असे साधारण ५ मोदक तयार झाल्यावर पातेल्यात पाणी ठेवणे व त्यात चाळणी ठेवून त्यात हे मोदक उकडण्यास ठेवणे.
  10. ५-६ मिनिटात हे उकडून होतात. (हे मोदक मोदकपात्रातही उकडतात, पण ते नसल्यास असे चाळणीत घालून उकडणे).

असे गरम गरम पारंपारिक मोदक साजूक तुपाबरोबर खाण्यास घेणे.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

कालनिर्णय आरती संग्रह व श्रीगणेश पूजन पुस्तिका इथे क्लिक करून डाऊनलोड करा. 


कालनिर्णय स्वादिष्ट २०१७