पुरणपोळी

Published by Mangala Barve on   February 22, 2018 in   1974Festival recipesFood Corner

पुरणपोळी  बनविण्यासाठी –

साहित्यः


  1. १ किलो हरभऱ्याची डाळ
  2. अर्धा किलो उत्तम पिवळा गूळ
  3. अर्धा किलो साखर
  4. १०-१५ वेलदोडयाची पूड
  5. थोडेसे केशर
  6. आवडत असल्यास थोडी जायफळ पूड
  7. १ फुलपात्र (किंवा मोठी वाटी चालेल) रवा
  8. १ फुलपात्र कणीक
  9. २ फुलपात्रे मैदा
  10. १ वाटी तेल
  11. मीठ

कृती:


  • परातीत रवा घेऊन त्यात थोडं पाणी घालून भिजत ठेवावा.
  • नंतर त्यात मैदा, कणीक व मीठ घालून पीठ भीजवावे.
  • नंतर त्यात थोडे थोडे तेल घालून कणीक चांगली तिंबून घ्यावी.
  • पुरणपोळयाची कणीक नेहमीच्या पोळयापेक्षा सैलच असते.
  • आदल्या दिवशी पुरण शिजवून वाटून तयार करून ठेवावे.
  • डाळ चांगली शिजल्याशिवाय गूळ घालू नये.
  • पुरणात थोडेसे मीठ घालून पुरण तयार करावे.
  • नंतर कणकेच्या पारीत पुरण भरून हलक्या हाताने तांदळाच्या पिठीवर पोळया लाटाव्या.

– सौ.मंगला बर्वे | या महिन्याचा मेनू – कालनिर्णय मार्च १९७४