साहित्यः
- २ वाट्या तांदूळ
- १ वाटी चिरलेला कांदा
- २ टीस्पून लसूणपेस्ट
- ४ टेबलस्पून तूप
- १/२ वाटी चिरलेला टोमॅटो
- चवीनुसार तिखट, मीठ
- १/४ किलो फणस
- ४ टीस्पून चहापत्ती
- १/२ टीस्पून साखर
कृतीः
- कांदा व लसूण वाटा.
- वाटलेला कांदा व लसूण तुपावर परता.
- थोडे लालसर झाले की त्यावर टोमॅटो, तिखट, मीठ व फणसाचे तुकडे घालून परता.
- चांगले परतल्यावर त्यात थोडे पाणी घालून फणस शिजू द्या.
- मिश्रण कोरडे करा.
- दुसऱ्या एका पातेल्यात तुपावर कांदा परता.
- त्याच पातेल्यात थोडे तेल घालून अर्धी वाटी चहापत्तीचे पाणी घाला.
- नंतर थोडे मीठ व तांदूळ घालून भात शिजवा.
- भात ८०% शिजल्यावर त्यात फणसाचे तुकडे व चवीनुसार साखर घाला.
- झाकण लावून एक वाफ आणून पुलाव शिजवा.
– कालनिर्णय स्वादिष्ट एप्रिल २०१५