फ्रूट पुलाव बनविण्याची रेसिपी –
साहित्य :
- ३/४ वाटी तांदूळ (कोणताही सुवासिक)
- प्रत्येकी १/४ वाटी केळी आणि सफरचंदाचे तुकडे
- १/४ वाटी संत्र्याचा रस
- प्रत्येकी २ लवंगा
- वेलची
- दालचिनी
- २ – ३ जर्दाळू
- ७ – ८ काजू पाकळ्या
- तूप
- १/२ वाटी साखर
कृती :
- एक टेबलस्पून तुपाची, लवंग – वेलची – दालचिनी घालून फोडणी करावी.
- त्यावर धुवून निथळलेला तांदूळ परतावा.
- सव्वा वाटी गरम पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा.
- अर्धा टेबलस्पून तुपावर केळी आणि सफरचंद परतावे.
- दोन-तीन मिनिटे झाकण ठेवावे. त्यात अर्धी वाटी साखर घालावी.
- मिश्रण पातळ झाले की, भातावर ओतावे. गरजेनुसार संत्र्याचा रस घालावा.
- शिते मोकळी राहतील आणि भात नीट शिजेल इतपत रस घालावा.
- पातेल्याच्या खाली तवा ठेवून बारीक गॅसवर भात शिजू द्यावा.
- हा भात गार किंवा गरम कसाही छान लागतो.