ऋषिपंचमीची भाजी | Rishi Panchami Vegetable Recipe

Published by कालनिर्णय स्वादिष्ट on   August 26, 2017 in   Food Corner

साहित्यः

  • अळूची १ जुडी
  • लाल भोपळयाचे मोठे तुकडे १ वाटी
  • लाल माठाचे दांडे चिरून(एक मोठी दांडी),
  • सुरणाचे मोठे तुकडे १ वाटी
  • ३ किंवा ४ सफेद भेंडीचे दोन तुकडे
  • घेवडयाचे तुकडे १ वाटी
  • गवारचे तुकडे १ वाटी
  • एक लांब पडवळ तुकडे केलेले
  • एका शिराळ्याचे मोठे तुकडे
  • ४ ते ५ आंबाडे
  • एका मक्याचे तीन ते चार तुकडे
  • गुळ चवीनुसार
  • ओल खोबर अर्धी वाटी
  • गडद हिरव्या मिरच्या ३ ते ४
  • १ चमचा जिर
  • पाव चमचा हिंग
  • चवीनुसार मीठ
  • किंचीत हळद.

कृतीः

  • सर्व भाज्या एकत्र करा त्यात अळूची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्या.
  • अळूच्या दांडयांची साले काढून तुकडे करा.
  • लाल भोपळ्याची साले काढून तुकडे करा.
  • माठाची दांडे सोलून तुकडे करा.
  • सुरणाचे साल काढून तुकडे करा.
  • सफेद भेंडीचे तुकडे घ्या.
  • घेवडयाच्या कडेच्या रेषा काढून तुकडे करा.
  • गवारचे तुकडे करा.
  • पडवळची साले काढून तुकडे घ्या.
  • शिराळीच्या टोकेरी कडा काढून चिरुन घ्या.
  • नंतर एका मोठया पातेल्यात १ पळीभर तेल टाकून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला.
  • जीर घाला. हिंग घाला. चिमुटभर हळद घाला. नंतर सर्व भाज्या घाला.
  • मंद अग्नीवर भाज्या शिजवा.
  • नंतर त्यात आंबाडे सोलून स्वच्छ धुवून थोडस ठेचा व भाजीत टाका.
  • नंतर त्यात उकडलेले मक्याचे तुकडे घाला.
  • जास्तीच पाणी घालू नका. भाज्यांना स्वतःच पाणी सुटते.
  • भाजी शिजत आल्यावर वरुन गुळ व मीठ चवीनुसार घाला.
  • वरुन ओल खोबर घालून एक वाफ काढा. भाजी सारखी ढवळू नका.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

टिपः मका घालायचा असेल तर आधी कुकरला लावून शिटया करून घ्याव्यात. त्यामुळे मका भाजीत चांगला मुरेल. तसेच भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घातल्या तरी चालतील. आंबाडे नाही मिळाले तर चिंचेचा कोळ घालावा.