साहित्यः
- १ लिटर दूध
- साखर
- १० ते १२ बदाम
- ५ ते ६ पिस्ते
- ५ ते ६ काजू
- जायफळपूड किंवा वेलचीपूड
कृतीः
- मंद आचेवर दूध आटवा.
- १ लिटर दूध असेल तर आटवून १/२ लिटर दूध करा.
- गरम असतानाच आवडीनुसार त्यात साखर घाला. गॅस बंद करा.
- बदाम आधीच भिजत ठेवा, नंतर त्याची साले काढा.
- अर्ध्या बदामाचे पातळ काप करा. उरलेले जाडसर वाटा.
- पिस्त्याचे बारीक काप करा, काजूचे पातळ काप करा.
- दुधात सर्व सुका मेवा चांगला एकजीव करा.
- सर्वात शेवटी वरुन जायफळपूड किंवा वेलचीपूड घाला
वेगळा रंग घालण्याची गरज नाही. दूध चांगले आटवल्यामुळे मसाले दूधाला बदामी रंग येईल.
टीपः कोजागरी पौर्णिमेला मसाल्याचे दूध आवर्जून दिले-घेतले जाते. कोजागरीला चंद्रप्रकाशात आटवलेले मसाला दूध पिण्याची परंपरा आहे.