ग्रील्ड स्प्राऊटेड रागी सँडविच
सारणासाठी साहित्य : १ कप मोड आलेली रागी (चांगले मोड येण्यास २ ते ३ दिवस लागतात), २ छोटे कप उकडून लगदा केलेले बटाटे, २ क्युब चीज (किसलेले), १/२ कप ओट्स, २ चमचे आले-लसूण पेस्ट, २ छोटे चमचे तिखट, १/२ चमचा आमचूर पावडर, चवीप्रमाणे मीठ, थोडी कोथिंबीर.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिसळून घ्या.
बेससाठी साहित्य : २ वाट्या बारीक रवा, मीठ, पाणी, चिमूटभर खाण्याचा सोडा.
कृती : रवा, मीठ, पाणी घालून वीस मिनिटे भिजू द्या. नॉनस्टिक तव्यावर साजूक तूप घालून त्यावर रव्याचे मिश्रण घाला. आता त्यावर वरील सारण पसरवा. परत त्यावर रव्याचे सारण पसरवा. छान खरपूस भाजून घ्या. कट करून सँडविच सर्व्ह करा.
टीप : ब्राऊन/व्हाइट ब्रेडही वापरता येईल.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
संध्या उबाळे, औरंगाबाद