कवळ्याची भाजी
मराठी नाव : कवळा
इंग्रजी नाव : Sensitive Smithia
शास्त्रीय नाव : Smithia Sensitiva
आढळ : महाराष्ट्रातील ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने सर्रास आढळते.
कालावधी : जून ते ऑगस्ट
वर्णन : कवळा हे लाजाळूसारखे संयुक्त बारीक पाने असलेले फूटभर वाढणारे झुडूप आहे. या झुडूपाच्या पानांवर दाब पडल्यास पान मिटतात.कवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.
साहित्य : १ जुडी कवळ्याचीभाजी, १ मोठा कांदा, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, १ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा हळद, मीठ, खवलेले खोबरे आवडीनुसार, फोडणीसाठी तेल.
कृती : प्रथम कवळ्याची कोवळी पाने स्वच्छ धुऊन बारीक कापावी. कांदा बारीक कापावा. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, हिंग, कांदा परतून घ्यावा. त्यानंतर हळद घालून भाजी शिजत ठेवावी. सर्वात शेवटी मीठ आणि ओले खोबरे घालून परतावे.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– नम्रता मांजरेकर