विलायती बिर्याणी बनविण्यासाठी –
साहित्य:
- २ कप जुना बासमती तांदूळ
- १ कप ब्रोकोली(तुकडे)
- १/२ कप हिरवी,लाल,पिवळी कॅप्सिकम
- १ कप मशरूम
- १/२ कप कॉर्न
- २ कप टोमॅटो प्युरी
- १ टेबलस्पून चिली फ्लेक्स
- १ टेबलस्पून मिक्स हर्ब
- तेल
- मीठ
- ४-५ लसूण पाकळ्या
- ३ चीज क्युब्स
कृती:
- तांदूळ अर्धा तास आधी भिजवा. शिजवून घ्या.
- त्यानंतर पूर्ण मोकळा करा.
- कॉर्न उकडून घ्या.
- भांड्यात तेल गरम करुन त्यात लसून घाला. लाल होऊ देऊ नका.
- त्यात ब्रोकोली, कॅप्सिकम घाला व शिजू द्या.
- मशरुम्स घालून परता. उकडलेले कॉर्न घाला.
- टोमॅटो प्युरी, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब घालून चवीनुसार मीठ घाला.
- एका जाड बुडाच्या पातेल्यात तळाला थोडे तेल लावा.
- त्यावर थोडा शिजवलेला भात पसरा.
- पुन्हा भाताचा थर, भाज्यांचा थर, चीजचे तुकडे पसरवून सर्वात वर भाताचा थर लावा.
- पातेल्यावर घट्ट झाकण ठेवा.
- खाली तवा ठेवून दहा मिनिटे मंदाग्नीवर ठेवा.
- सलाडसोबत सर्व्ह करा.