साहित्य : १/२ वाटी फ्लॉवर, १/२ वाटी गाजर, १/२ वाटी ब्रोकली, १/२ वाटी मशरूम, १/२ वाटी बेबी कॉर्न, १ वाटी कोणताही आवडता पास्ता, १ मोठा चमचा बटर / लोणी, १ मोठा चमचा तूप, १/४ क्यूब मोझरेला चीज, २ क्यूब प्रोसेस्ड चीज, चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
कृती : सर्व भाज्या पाण्यामध्ये शिजवून गाळून घ्या व मिक्सरमध्ये भाज्यांची पेस्ट बनवा. उरलेले पाणी स्टॉक म्हणून बाजूला ठेवा. एक वाटी पाण्यात थोडे तेल आणि मीठ घालून पास्ता शिजवून घ्या. एका पॅनमध्ये तूप आणि लोणी गरम करून त्यामध्ये भाज्यांची पेस्ट घालून नीट एकत्र करून घ्या व परता. वर मोझरेला आणि प्रोसेस्ड चीज किसून घाला. चीज नीट वितळेपर्यंत गरम करा. नंतर चवीप्रमाणे मीठ आणि मिरपूड घाला. जास्त घट्ट वाटल्यास त्यामध्ये थोडेसे दूध किंवा व्हेजिटेबल स्टॉक घालून गरजेप्रमाणे पातळ करून घ्या. त्यामध्ये शिजवलेला पास्ता घालून नीट एकत्र करून गरमागरम सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मिनौती पाटील