व्हेज बिर्याणी
साहित्य:
- २ वाटी बासमती तांदूळ
- १ मूठ शेंगदाणे
- १०-१२ मनुके
- १ वाटी दूध
- केशर
- मटार
- फ्लॉवर
- घेवडा
- गाजर
- व्हेज बिर्याणी मसाला
- खडा मसाला (लवंग, दालचिनी, वेलदोडा, तमालपत्र)
- १ वाटी दही
- कांदा
- टोमॅटो
- आले
- तिखट
- हळद
- धणेपूड
- पाव वाटी तूप
- पाव वाटी तेल
कृती:
- बिर्याणी करण्याआधी शेंगदाणे आणि मनुके पाण्यात किंवा नारळाच्या दुधात भिजवून ठेवावे.
- केशर दुधात घालून ठेवावे.
- सर्व भाज्या स्वच्छ धुतल्यानंतर तिरप्या चिरून घ्याव्या.
- भात मोकळा शिजवून घ्यावा. शेंगदाणे आणि मनुका पेस्ट करून घ्यावी.
- शेवटी शिजलेला भात आणि भाजी एकत्र करून त्याला वाफ आणावी.
- सर्व्ह करताना वरून गाजराचे तुकडे घालावेत.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
Pingback: Chocolate chips and Banana muffins | Food Corner - Kalnirnay Blog
Pingback: Cheettinad Mushroom Biryani | Food Corner - Kalnirnay Blog - Kitchen instant recipes
Pingback: Muffin | Chocolate chips and Banana muffins | Food Corner