शतावरी ड्रायफ्रूट कुकिज बनवण्यासाठी लागणारे-
साहित्य:
- ११/२ वाटी गव्हाचे पीठ
- १/२ वाटी एक्सचेंज पीठ
- १/२ वाटी खारकेची पूड
- १/२ वाटी गूळ किंवा पिठीसाखर
- १/२ वाटी लोणी
- १/२ वाटी दूध
- २ चमचे बदामाची पूड
- १/२ टीस्पून वेलची पूड
- १/४ टीस्पून जायफळ पूड
- १/२ टीस्पून बेकिंग पावडर
- १/४ वाटी शतावरी पावडर
कृती:
- लोणी, दूध आणि गूळ मिक्सरमधून काढा. त्यात गव्हाचे पीठ, ओट्स पीठ, खारीक पावडर, बदामाची पूड, जायफळ- वेलची पूड घाला.
- यात शतावरी पूड आणि बेकिंग पावडर सर्व मिश्रण एकत्र करून गोळा करा.
- हे मिश्रण मळून पुरीएवढी जाडसर पोळी लाटा. या पोळीला पाहिजे तो आकार देऊन बिस्किटे कापा.
- त्यावर ब्रशने दूध लावून काजूचे तिकडे व चारोळी लावा.
- बेकिंग ट्रेला लोण्याचा हात लावून मैदा भुरभुरून त्यावर ही बिस्किटे ठेवून ३६० सेंटिग्रेडवर वीस मिनिटे बेक करून घ्या. आरोग्यदायी कुकिज तयार.