शाही तुकडा बनविण्यासाठी –
साहित्य
- ६ ब्रेड स्लाईस
- १ कप रबडी
- ३/४ कप दूध
- बदाम
- पिस्ते
- चारोळी
- साजूक तूप
- केशर
कृती
- ब्रेडच्या कडा कापून प्रत्येक स्लाईसचे त्रिकोणी दोन तुकडे करा.
- साजूक तुपात लालसर रंगावर तळून घ्या व पसरट प्लेटमध्ये हे तुकडे काढा.
- दूध गरम करून त्यात केशर घाला व हे दूध ब्रेडच्या स्लाईसवर घालून पंधरा मिनिटे ठेवा.
- नंतर ज्या प्लेटमध्ये सर्व्ह करणार असाल त्यात ब्रेडचे स्लाईस काढा.
- उरलेले दूध रबडीत घालून एकत्र करा.
- ब्रेड स्लाईसवर रबडी घाला.
- वरून बदाम-पिस्त्याचे काप व चारोळीने सजवा.