सफरचंदाची टाॅफी बनविण्यासाठी –
साहित्य:
- १ १/४ किलो सफरचंद
- ७५० ग्रॅम साखर
- २०० ग्रॅम लोणी
- केशरी किंवा लाल रंग
- १/२ टीस्पून सायट्रिक अॅसिड
- चिमूटभर मीठ
कृती:
- सफरचंदाची साले व बिया काढून लहान तुकडे करून थोड्या पाण्यात मऊ शिजवा.
- पाणी गाळून तुकडे मॅश करून घ्या.
- त्यात साखर घालून शिजण्यास ठेवा.
- पन्नास ग्रॅम लोणी काढून ठेवा, उरलेले थोडे मिश्रणात घाला.
- टाॅफी झाली हे पाहण्यासाठी थंड पाण्यात थोडे मिश्रण घाला.
- गोळी झाल्यास टाॅफी तयार झाली समजा.
- एका ट्रेला थोडेसे लोणी लावून त्यावर त्यावर मिश्रण पसरा व त्यावर थोडेसे लोणी पसरवा.
- तुकडे करुन सर्व्ह करा.