प्रोटीन केक
साहित्य॒: ११/२ कप ओट्सचे पीठ (मिक्सरमधून ओट्स बारीक करून घ्या), १ कप बदामाचे पीठ (मिक्सरमधून बारीक केलेले), १/२ छोटा चमचा बेकिंग पावडर, १/२ छोटा चमचा बेकिंग सोडा, १ छोटा चमचा बदाम इसेन्स, १ छोटा चमचा कोको पावडर (हवे असल्यास), १ छोटा चमचा कुकिंग तेल (कुठलेही), १/२ कप दूध, ३/४ कप पिठीसाखर, ३ अंडी, १/२ कप ड्रायफ्रुटस (अक्रोड, बदामाचे काप, भोपळ्याच्या बिया व सूर्यफुलाच्या बिया).
कृती॒: प्रथम १८० अंश सेल्सिअसला ओव्हन तापवून केकचे भांडे ग्रीस करून ठेवा. एका प्लेटमध्ये ओट्सचे पीठ, बदामाचे पीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकत्र करून ठेवा. बाऊलमध्ये तीन अंडी फेटून घ्या. त्यात पिठीसाखर घालून चांगले ढवळा. त्यात बदामाचा इसेन्स, तेल आणि दूध घालून चांगले मिक्स करा. ह्या मिश्रणात कोरडे साहित्य घाला आणि पुन्हा चांगले मिक्स करा. थोड्या कोरड्या मिश्रणात ड्रायफ्रुटस घाला आणि मिक्स करा. ग्रीस केलेल्या भांड्यात मिश्रण
ओता. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअसला ३० ते ३५ मिनिटे ठेवा. टूथपिकने तपासा. बाहेर काढून ५ ते १० मिनिटे थंड होऊ द्या. नंतर हव्या त्या आकारात प्रोटीन केक कापून घ्या.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
पूजा बर्वे, पुणे