साळीच्या लाह्यांची चटणी
साहित्य॒: १ वाटी साळीच्या लाह्या, १ चमचा तीळ, २ चमचे डाळे, चवीनुसार मीठ, ८ ते १० कढीपत्त्याची पाने, थोडी साखर, ५ ते ७ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा जिरे, १ चमचा हिंग.
कृती॒: प्रथम कढई घेऊन त्यात लाह्या, जिरे, डाळे, हिंग, कढी पत्ता, तीळ सर्व कोरडेच खमंग भाजा, शेवटी सुक्या मिरच्या भाजा. गार झाले, की जाडसर भरडप्रमाणे मिक्सरमधून काढा. ही चटणी तीन ते चार महिने टिकते. दह्यात कालवून किंवा तेल घेऊन खाऊ शकतात.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
स्मिता इनामदार, पुणे