मावा अनारसे
पिठासाठी साहित्य॒: १ कप तांदळाचे पीठ, १/२ कप गूळ, २ चमचे तूप, १ चमचा तीळ, ४ चमचे दूध, चिमूटभर मीठ.
सारणासाठी साहित्य॒: २ चमचे मावा, १ चमचा गूळ, १ चमचा सुका मेवा पावडर, २ चमचे वेलची पावडर.
सजावटीसाठी साहित्य॒: २ चमचे खसखस, २ काजू.
कृती॒: प्रथम तांदळाच्या पिठात तूप, गूळ एकत्र करून घ्या. त्यात दूध घालून मळून घ्या. पंधरा मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवा. आता एका बाऊलमध्ये तीळ, मावा, गूळ, सुका मेवा पावडर, वेलची पावडर घालून एकत्रित करून घ्या. आता मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्याला वाटीसारखा आकार देऊन त्यात हे अर्धा चमचा सारण घाला व त्या गोळ्याला अनारशाचा आकार द्या. त्यावर थोडी खसखस आणि काजू लावून २००० तापमानाला प्रीहिटेड ओव्हनमध्ये पंधरा मिनिटांसाठी बेक्ड करून घ्या. मावा अनारसे तयार.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्रियंका येसेकर, ठाणे