चिकू कतली
साहित्य : ४-५ पिकलेले चिकू, १/२ वाटी काजू पावडर, १/२ वाटी साखर, १/४ वाटी खवा, २ चमचे साजूक तूप, २-३ चमचे डेसिकेटेड कोकोनट, ४ चमचे मिल्क पावडर.
कृती : चिकूची साले व बिया काढून टाका आणि गर मिक्सरमध्ये वाटून घ्या. कढईत एक चमचा साजूक तूप व मिक्सरमध्ये वाटलेला चिकूचा गर घाला.पाण्याचा अंश कमी होईपर्यंत परता व थंड होण्यासाठी ठेवा. कढईत खवा घालून परतून घ्या. त्यात चिकूचा गर, काजू पावडर व साखर घालून मंद आचेवर परतवा. मिश्रणाचा गोळा तयार होत असताना डेसिकेटेड कोकोनट व मिल्क पावडर घालून गोळा घट्ट होऊ द्या. ताटाला तुपाचा हात फिरवून त्यात तयार मिश्रण पसरवून घ्या. थंड झाल्यावर वड्या पाडा आणि सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– अनघा जोशी, पुणे