रोझ काला जामुन
साहित्य :
- १ कप मावा (खवा),
- ३-४ चमचे पनीर
- दीड चमचा सुजी (रवा),
- ३-४ चमचे मैदा
- १ चमचा कॉर्नफ्लोअर
- १ चमचा वेलची पूड
- १ चमचा साखर
- चिमटभर बेकिंग पावडर
सारण :
- दीड चमचा गुलकंद,
- काजूचे तुकडे,
- ३ कप साखर आणि २ कप पाण्याचा पाक तयार करावा.
- १ कप व्हिप्ड क्रीम
- २ चमचे रोझ सिरप, गार्निशिंगसाठी गुलाबाच्या पाकळ्या
कृती :
- एका भांड्यात मावा, पनीर, सुजी, मैदा, कॉर्नफ्लोअर, वेलची पूड, साखर आणि बेकिंग पावडर घालून मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे. दोन चमचे खवा, गुलकंद आणि काजूचे तुकडे घालून सारण तयार करावे.
- खव्याचे मिश्रणाचे गोळे करून त्यात खवा, गुलकंद आणि काजूचे सारण भरून गोळे तयार करावेत.
- हे गोळे तेलात किंवा तुपात तळून घ्यावेत. तळताना पाण्याचे शिंतोडे मारावेत म्हणजे जामुनला रंग छान येईल आणि टे जळणार नाहीत.
- तळलेले जामुन ३० ते ४० मिनिटे पाकात ठेवून नंतर ते डिशमध्ये काढून व्हिप्ड क्रीम, रोझ सिरप आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करून रोझ काला जामुन डिश सर्व्ह करावी.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सौजन्य : आम्ही सारे खवय्ये – कालनिर्णय स्वादिष्ट आवृत्ती सप्टेंबर २०१६