साहित्य :
- ३०० ग्रॅम पनीर
- २ वाट्या सोललेले पिस्ते
- २ वाट्या दूध
- 200 ग्राम पिठीसाखर
- ४ टेबलस्पून तूप
- १ टीस्पून वेलची पावडर
- सजावटीसाठी बदामाची काप
कृती :
- पिस्त्याचे बी दोन तास दुधात भिजवून ठेवावे त्यात टे फुलून येईल. मग दुधासह मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- पनीर हाताने मोडून त्यात पिठीसाखर मिक्स करावी. पिस्त्याचे मिश्रण त्यात घालून हे सारे पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
- नॉनस्टिक भांड्यात तूप गरम करून हे मिश्रण त्यात घालावे. मंद आचेवर मिश्रण आळू द्यावे. आधी ते सैल होईल, मग आळेल.
- मिश्रण सतत ढवळत राहावे. बर्फी सेट होऊ शकेल एवढे आळल्यावर ते खाली उतरवावे आणि त्यात वेलची पावडर घालावी. तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण सेट करावे. त्यावर बदामाच्या सळ्या भूरभूराव्यात.
- बदामाचे साल काढू नका. हिरवट, पांढऱ्या बर्फीवर बदामाचे काप छान दिसतात.
- आवडत असेल तर मसाल्याच्या मोठ्या वेलचीचे काही दाणेही या बर्फीवर घालता येतात. गार झाल्यावर बर्फी कापावी. ही बर्फी फ्रीजमध्ये ठेवून चार दिवस आणि बाहेर दोन दिवस राहते.