साहित्य :
- ५०० मिली संत्र्याचा रस
- २५० मिली पेरूचा रस
- चवीपुरते काळे मीठ
- २ चमचे मध
- ६-७ लिंबाच्या फोडी
- १५-२० पुदिन्याची पाने
- चवीपुरते मीठ
- बर्फाचे तुकडे
- वॉटर सोडा
कृती:
- प्रथम एका भांड्यात लिंबाच्या फोडी, काळे मीठ, साधे मीठ, मध आणि पुदिन्याची पाने एकत्र क्रश करून घ्यावी.
- त्यात संत्र्याचा रस, पेरूचा रस घालून एकत्र करून घ्यावे.
- हा एकत्र केलेला रस एका ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये तीन-चार बर्फाचे तुकडे आणि हलक्या हाताने वॉटर सोडा घालावा.
- वरून लिंबे आणि संत्र्याच्या फोडीचे सजावट करून सिट्स सनशाईन पिण्यास द्यावे.