साहित्य :
- ४ – ५ व्हॅनिला स्लाईस केक
- ४-५ टेबलस्पून फ्रेश क्रीम
- २ टेबलस्पून प्रत्येकी बारीक चिरलेला अननस, सफरचंद, किवी, डाळिंबाचे दाणे व आपल्याला हवी असलेली इतर कोणतीही फळे घ्यावी.
कृती :
- एका स्लाईस केकचे सारखे चार चौकोनी तुकडे कापावेत. क्रीम हलक्या हाताने फोर्कने घट्ट होईपर्यंत फेटून घ्यावे.
- कापलेल्या चौकोनांवर थोडे थोडे क्रीम लावावे आणि त्यावर कापलेले फळांचे तुकडे आपल्या आपल्या आवडीनुसार रचावे.
- फ्रीजमध्ये ठेवून सर्व्ह करावेत.
Pingback: पिझ्झा | चीज पिझ्झा | मिनौती पाटील | कालनिर्णय स्वादिष्ट २०१९