अष्टगुणी लाह्यांचे मोदक – लेखा तोरसकर

Published by Kalnirnay on   August 19, 2019 in   2019Festival recipesFood Corner

 

अष्टगुणी लाह्यांचे मोदक


साहित्य:
प्रत्येक १/२ वाटी गहू, मका, ज्वारी, राजगिरा, तांदूळ, सालांचा भात, साबुदाणा व जवस यांच्या लाह्या, १५० ते २०० ग्रॅम किंवा जेवढे गोड हवे असेल त्या प्रमाणात गूळ, १ छोटा चमचा खारीक पावडर, १ छोटा चमचा काजू-बदाम-पिस्ता यांचे काप, ४ मोठे चमचे साजूक तूप, १ मोठा चमचा दूध, २ मोठे चमचे गुळाचे कॅरेमल चिक्कीप्रमाणे करून त्याचे तुकडे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.

कृती:
प्रथम कढईत तूप गरम करून घ्या. त्यात गूळ घाला म्हणजे गूळ वितळेल. गॅस मंद ठेवा. सगळ्या लाह्या वेगवेगळ्या भाजून मिक्सरमध्ये वेगवेगळ्या वाटा. नंतर बाऊलमध्ये एकत्र करा. वरील आठ प्रकारच्या वाटलेल्या लाह्यांचे मिश्रण वितळलेल्या गुळात घाला व परतून घ्या. गॅस मंदच ठेवा. त्यात ड्रायफ्रूटचे काप, खारीक पावडर घालून ढवळवा. नंतर वेलची पावडर, दूध पावडर घालून ढवळवा. गरम असतानाच साच्याने मोदक करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


-लेखा तोरसकर