दही पोहे बनविण्यासाठी
साहित्य:
- २ वाट्या पातळ पोहे
- २ वाट्या गोड दही
- फोडणीसाठी तूप
- जिरे
- ४ हिरव्या मिरच्या
- १० लसूण पाकळ्या
- कोथिंबीर
- चवीप्रमाणे मीठ
- साखर
- दूध
- फरसाण
कृती:
- प्रथम पोहे धुवून घेणे.
- त्यात दही, मीठ, साखर घालणे.
- पळीमध्ये तूप घालून त्यात जिरे, मिरच्या, लसूण पाकळ्या घालणे व ही फोडणी पोह्यांना देणे.
- सर्व मिश्रण नंतर कालवणे.
- घट्ट वाटल्यास थोडे दूध घालून पोहे सरसरीत करणे.
- खाण्यास देताना वरती थोडे फरसाण घालून कोथिंबीर घालून देणे.
*Note: फोडणीत खांडणी मिरची घातल्यास जास्त खमंग लागते.