साहित्य
- स्लाईस ब्रेड
- २ टेबलस्पून चटणी (सँडविचला करतो ती)
- उकडलेला बटाटा
- १ टेबलस्पून बटर
Tiffin Box recipe :Tangy Veggie wrap
कृती
- ब्रेडचे तीन स्लाईसेस घेऊन त्याच्या कडा काढून टाकाव्यात.
- तीनही स्लाईस पाण्याचा वापर करून एकमेकांना जोडावेत.
- त्यावर चटणी,उकडलेला बटाटा(बारीक करून), बटर ब्रेडच्या तीनही स्लाईसवर लावावे.
- एका बाजूने स्लाईस हळूच दुमडून घ्यावेत.
- ते सर्व ओल्या नॅपकिन मध्ये गुंडाळून २ तास फ्रीजमध्ये ठेवावेत.
- खायच्या आधी फ्रीजमधून बाहेर काढून अर्धा इंचाचे काप करावेत.
- तीन काप केल्यावर आपल्याला ५-६ सँडविच मिळतात.