उपवासाचा मँगो पंचामृत पिझ्झा
साहित्य॒: १ कप उपवास भाजणी पीठ, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, १/४ चमचा खाण्याचा सोडा, १/४ कप दही, १/२ ते १/४ कप पिठीसाखर, १/२ कप दूध, १/२ कप मध, १/४ कप साजूक तूप, १/२ कप आंब्याचा रस.
मँगो सॉसच्या टॉपिंगसाठी साहित्य॒: १/२ कप आंब्याचा रस, ३ चमचे साखर, ३ चमचे काजू, बदाम फ्लेक्स, ३ चमचे आंब्याच्या फोडी‧
पिझ्झा बनविण्याची कृती॒: प्रथम दही, साखर, मध, दूध, तूप, आंब्याचा रस एकत्र करून चांगले फेटून घ्या.बेकिंग पावडर, खाण्याचा सोडा यात घाला.वरील मिश्रणात भाजणीचे पीठ घाला व चांगले फेटून घ्या.ग्रीस केलेल्या केक टीनमध्ये हे मिश्रण ओता.गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करा व त्यात केक टीन ठेवा.पिझ्झा दहा मिनिटे बेक करा.एक कप पिठात दोन पिझ्झा होतील.
टॉपिंगसाठी कृती॒: साखर व आंब्याचा रस एकत्र करून शिजवा.थोडे घट्ट झाले, की सॉस तयार.पिझ्झा थंड झाला, की त्यावर सॉस लावून काजू, बदाम फ्लेक्स पसरवून आंब्याच्या फोडी ठेवून गार्निश करून पिझ्झा सर्व्ह करा. उपवासाचा वेगळा पदार्थ तयार. हा पंचामृत पिझ्झा हेल्दी आणि पटकन तयार होतो.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मुक्ता उबाळे, औरंगाबाद