चिकन कोफ्ता
(अधिक प्रथिने, तेलरहित, कमी कर्बोदके आणि लो फॅट (स्निग्धांश) असलेले पदार्थ अशी ही चिकन कोफ्ता रेसिपी‧)
साहित्य: २५० ग्रॅम चिकनचे तुकडे किंवा खिमा, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ छोटा चमचा पुदिन्याची पाने, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, काळी मिरी व आवश्यकतेनुसार पाणी‧
कृती: एका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे किंवा खिमा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, पुदिन्याची पाने, आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ व काळी मिरी घालून मिश्रण चांगले एकत्र करून एक तास मुरू द्या.एका भांड्यात पाणी उकळवून मिश्रणाचे गोळे तयार करा.तयार गोळे उकळत्या पाण्यात घाला.शिजल्यानंतर चाट मसाला, कांदा व हिरव्या मिरचीसोबत सर्व्ह करा‧
टीप: कोफ्त्याचे गोळे बनविताना तळवे ओले करून बनवा, हाताला चिकटणार नाही.कोफ्ते अति शिजवल्यास कोरडे पडतील. कोफ्ते तव्यावर तेल घालून थोडेसे फ्राय करू शकता.त्यात पुदिना मेयोनिज टाकून रॅपमध्ये ते घालू शकता.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गिरीजा नाईक