कच्च्या कवठाचे लोणचे
साहित्य : १० कच्ची कवठे, ५०० ग्रॅम साखर, २०० ग्रॅम मीठ, १ पाकीट लोणचे मसाला, ८-१० लसणाच्या पाकळ्या, १/२ वाटी कच्ची बडीशेप (जाडसर पावडर), १०० ग्रॅम मोहरीची डाळ, तेल.
कृती : कच्ची कवठे फोडून आतला गर काढा. वरच्या आवरणाचे ठेचून तुकडे करा.गर व ठेचलेल्या तुकड्यांमध्ये साखर व मीठ घालून दोन दिवस ठेवा. तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. थोड्या तेलात मोहरीची डाळ भाजून घ्या. तेल कोमट झाल्यानंतर त्यात बडीशेप पावडर, लोणचे मसाला घाला. हे तेल थंड झाल्यानंतर कवठाच्या गरात घाला.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– मीनाक्षी काटकर, यवतमाळ