जॅकफ्रुट सालसा | अंजली कानिटकर, मुंबई | Jackfruit Salsa | Anjali Kanitkar, Mumbai

Published by अंजली कानिटकर, मुंबई on   February 23, 2022 in   Recipes

जॅकफ्रुट सालसा 

साहित्य: ८ ते १० कच्च्या फणसाचे गरे, १/२ वाटी ओले खोबरे, १/२ वाटी किसलेली कैरी, १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, ८ हिरव्या मिरच्या (आवडत असल्यास लाल मिरच्यासुद्धा चालतील), चवीप्रमाणे मीठ, १ चमचा साखर, १ लहान चमचा जिरे.

कृती: फणसाच्या गऱ्यातील आठळ्या काढून गऱ्यांचे लहानसर तुकडे करा, साधारण दोन लहान वाट्या होतील. आता मिक्सरमध्ये प्रथम मिरच्या, जिरे, कैरीचा कीस, मीठ, साखर घाला व एकदा फिरवून घ्या. नंतर त्यात चिरलेले गरे, ओले खोबरे, कोथिंबीर घाला व मिक्सरमध्ये चांगले बारीक होईपर्यंत वाटा. चटणी करताना त्यात पाणी अजिबात घालू नका, थांबून थांबून मिक्सर चालू करा, चटणी छान वाटली जाते. वाटताना हे मिश्रण फार कोरडे वाटले तर त्यात पाव कप दूध घाला. पाण्याचा वापर करू नका. दुधामुळे चटणी अधिक चविष्ट लागते. आंबट, तिखट व किंचित गोड चटणी तयार आहे. जॅकफ्रुट सालसा तयार.

टीप: ही चटणी जास्त करून कोकणात केली जाते. मिक्सरऐवजी पाट्यावर केलेल्या चटणीची चव काही औरच असते.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अंजली कानिटकर, मुंबई