ओली हळद मल्टीग्रेन आटा लाडू
साहित्य : १५० ग्रॅम ओली हळद, प्रत्येकी लहान वाटी जाडसर मल्टीग्रेन आटा (नाचणी, बाजरी, गहू, ज्वारी, जवस,ओट्स, तीळ, तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, चणाडाळ), १ वाटी गूळ पावडर (चवीनुसार), १ मोठा चमचा तूप, काजू, बदाम, मगज बिया, भोपळ्याच्या बिया (तुपात तळून जाडसर वाटून घ्या), डिंक पावडर (जाडसर), आवश्यकतेनुसार वेलची पूड‧
कृती : हळद स्वच्छ धुऊन किसून घ्या.कढईत तुपात डिंक तळून घ्या.त्यानंतर तुपात काजू, बदाम, मगज व भोपळ्याच्या बिया तळून घ्या.थंड झाल्यानंतर जाडसर वाटून घ्या.त्याच तुपात वरील सर्व पिठे मंदाग्नीवर दहा ते पंधरा मिनिटे परतून घ्या.मग जाडसर वाटलेले ड्रायफ्रूट, डिंक, वेलची पूड घालून परता.गूळ पावडर घाला.थोडे थंड झाल्यानंतर लाडू वळा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– प्रीती गुप्ते, नाशिक