हेल्दी कॉर्न कोंडुळे चाट | प्रभा गांधी, पुणे | Healthy Corn Kondule Chat | Prabha Gandhi, Pune

Published by प्रभा गांधी, पुणे on   September 16, 2021 in   Recipes

हेल्दी कॉर्न कोंडुळे चाट

साहित्य : १ कप मक्याचे पीठ, १ चमचा लाल तिखट, १/४ चमचा हळद, फोडणीचे साहित्य (मोहरी, जिरे, हिंग), १/४ चमचा ओवा, १ छोटा चिरलेला कांदा, १/२ वाटी कॉर्नफ्लेक्स किंवा मक्याचे पोहे, आवश्यकतेनुसार मीठ, पाणी तसेच गरम पाणी, तेल.

लाल चटणीसाठी साहित्य : १ आलुबुखार, १/४ चमचा जिरे, १/४ चमचा लाल तिखट, १/४ चमचा साखर, आवश्यकतेनुसार काळे मीठ.

हिरवी चटणीसाठी साहित्य : १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, १/४ वाटी पुदिना, २ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा लिंबाचा रस, १/४ चमचा जिरे व आवश्यकतेनुसार मीठ.

कृती : सर्वप्रथम मक्याच्या पिठात मीठ, ओवा, अर्धा चमचा तेल, हळद, लाल तिखट घालून गरम पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. फोडणीला तेल, मोहरी, जिरे, हिंग, चिरलेला कांदा घाला. मग त्यात अर्धा चमचा लाल तिखट, हळद, मीठ व दोन ग्लास पाणी घाला. मक्याच्या पिठाचे छोटे छोटे गोल रिंग करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर या रिंग्ज पाण्यात सोडा. पाणी आटेपर्यंत रिंग्ज शिजवून घ्या व गॅस बंद करा. यानंतर आलुबुखार, जिरे, लाल तिखट, काळे मीठ, साखर व थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून लाल चटणी तयार करा. चिरलेली कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, जिरे व मीठ मिक्सरमध्ये वाटून हिरवी चटणी तयार करा. त्यात लिंबाचा रस घाला. कॉर्नफ्लेक्स किंवा मक्याचे पोहे तळून त्यावर काळे मीठ भुरभुरा. तयार केलेल्या कॉर्न रिंग्ज प्लेटमध्ये घ्या. प्रत्येक रिंगवर लाल व हिरवी  चटणी पसरवा. चिरलेला कांदा घाला. तळलेले कॉर्नफ्लेक्स किंवा मक्याच्या पोह्यांसह सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– प्रभा गांधी, पुणे