भोपळा आणि गाजराचे सूप
साहित्य: १ कप भोपळ्याचे चौकोनी काप, १ कप गाजराचे चौकोनी काप, १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, लसणाच्या किसलेल्या २ पाकळ्या, चिमूटभर मिरची पावडर, काळी मिरी पावडर, चवीपुरते मीठ, फ्रेश क्रीम व पाणी / स्टॉक.
कृती: प्रेशर कुकरमध्ये सर्वप्रथम तेल तापवून घ्या. त्यात कांदा, लसूण, भोपळा व गाजर घालून परतवून घ्या. नंतर मीठ व काळी मिरी पावडर घाला. नंतर एक कप पाणी घालून झाकण लावा. प्रेशर कुकरमध्ये चार शिट्ट्या काढा. गॅस बंद करून हँड ब्लेंडरच्या साहाय्याने प्युरी तयार करून घ्या. तयार झालेले हे सूप गाळून घ्या आणि वरून भरडलेली मिरी पावडर व फ्रेश क्रीम घालून सर्व्ह करा.
टीप: व्हेजिटेबल स्टॉक उपलब्ध असल्यास घातला तरी चालेल. सूप पातळ हवे असल्यास गाळून घेतल्यानंतर त्यात थोडेसे गरम पाणी घाला.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गिरीजा नाईक