पेरूचे सूप
साहित्य : १ पेरू, १ पेर, १/२ वाटी रताळ्याचे काप, १/२ वाटी बटाट्याचे काप, २ हिरव्या मिरच्या, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा साखर, ८ ते १० पेरूची कोवळी पाने, १/२ वाटी लाल भोपळ्याचे काप, आवश्यकतेनुसार सैंधव मीठ, तूप, बटर किंवा मलई.
कृती : कढईत तूप, जिरे, कापलेल्या हिरव्या मिरच्या, पेरू, पेर, रताळ्याचे काप, बटाट्याचे काप, भोपळ्याच्या फोडी घालून चांगले परतवून घ्या. नंतर त्यात पेरूची पाने घालून उकळी काढा. आता यात साखर व मीठ घाला व आणखी दहा मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या. नंतर गॅस बंद करा व हे मिश्रण गाळून घ्या. उरलेला गाळ थंड करा. गाळ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून पुन्हा गाळून घ्या. गाळलेले मिश्रण कढईत घेऊन पुन्हा उकळी काढा. चवीसाठी बटर किंवा मलई घाला. पेरूचे पौष्टिक सूप तयार आहे.
टीप : हिरड्या मजबूत होण्यासाठी पेरूच्या पानांचा रस उत्तम आहे. तसेच अतिसार झाल्यास पेरूच्या पानांच्या रसाचा फायदा होतो.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– संगीता खैरमोडे, जोगेश्वरी