टॅकोज विथ सालसा
टॅकोज हा पदार्थ मक्याच्या पिठापासून तयार केला जातो, तर सालसा हा टोमॅटो, मिरचीपासून तयार केला जाणारा सॉस.
साहित्य: १ कप मक्याचे पीठ, कोमट पाणी (गरजेनुसार) व चवीनुसार मीठ.
स्टफिंगसाठी साहित्य: १ वाटी चवळी आणि राजमा (उकडलेला), २ कांदे, ३ टोमॅटो, ५-६ लसूण पाकळ्या, प्रत्येकी १ सिमला मिरची (लाल, पिवळी,हिरवी), १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, १ छोटा चमचा काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल‧
साहित्य: ४ टोमॅटो, ३ कांदे, १ काकडी, ३-४ हिरव्या मिरच्या, प्रत्येकी २ सिमला मिरची (लाल, पिवळी, हिरवी), १ कोथिंबीर जुडी‧
टॉपिंगसाठी साहित्य: किसलेले चीज, सोर क्रीम, आवश्यकतेनुसार पुदिना व कोथिंबीर‧
टॅकोजची कृती: सर्वप्रथम मक्याच्या पिठात चवीनुसार मीठ घालून कोमट पाण्यात पीठ मळून घ्या.तयार पिठाची भाकरी बनवा.
स्टफिंगसाठी कृती: गॅसवर वांगे भाजतो त्याप्रमाणे कांदे, लसूण पाकळ्या, टोमॅटो, सिमला मिरची (लाल, पिवळी, हिरवी) भाजून घ्या.भाजल्यानंतर वरचे आवरण काढून वेगवेगळे जाडसर ठेचून घ्या.
सारणासाठी कृती: पॅनमध्ये तेल गरम करून त्यात ठेचलेला कांदा, लसूण व सिमला मिरची घाला. नंतर यात ठेचलेली हिरवी मिरची, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर व चिमूटभर काळीमिरी पावडर घालून परतून घ्यावे. नंतर त्यात शिजवलेली चवळी व राजमा कुस्करून (क्रश करून) घाला व मिश्रण चांगले परतवून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून वाफ काढा. चवीनुसार मीठ घालून वरून कोथिंबीर भुरभुरवा.
सालसासाठी कृती: कांदा, लसूण व सिमला मिरची एकत्र करून त्यात मीठ व मिरपूड घाला. त्यात काकडी बारीक ठेचून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
स्टफिंगसाठी: तयार भाकरीवर सारण पसरवून घ्या. त्यावर सालसाचे टॉपिंग करा व वरून किसलेले चीज, सोर क्रीम घाला. पुदिन्याची पाने व कोथिंबिरीने सजवा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
निलेश लिमये