साहित्य:
- २-३ वाट्या पातळ पोहे
- २ छोट्या कोवळ्या काकड्या
- १/४ वाटी बारीक चिरलेली कैरी
- १/२ वाटी खवलेले खोबरे
- २-३ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- तेल
फोडणीचे साहित्य:
- २ टेबलस्पून पिठीसाखर
- मीठ
- १ छोटा बारीक चिरलेला कांदा
कृती:
- पोहे हलके होईपर्यंत भाजून घ्यावे.
- मिरच्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे.
- काकडी बारीक चिरून घ्यावी.
- २-३ टेबलस्पून तेल गरम करावे.
- त्यात मोहरी घालून तडतडू द्यावे.
- लगेच हिंग, जिरे आणि मिरच्यांचे तुकडे घालून ढवळावे.
- मिरच्या लालसर झाल्या की, गॅस बंद करावा.
- तयार फोडणी भाजलेल्या पोह्यांवर घालून मीठ, साखर घालून हलक्या हाताने व्यवस्थित ढवळावे.
टिप्स:
- पोहे खायच्या ऐन वेळेला त्यात कांदा, काकडी, कैरी, कोथिंबीर घालून हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून लगेच खायला द्यावे.
- कैरी नसेल तर लिंबू वापरावे. कैरी फार आंबट नसावी.
- फारशी तेलकट वा मसालेदार नसलेली ही रेसिपी मुलांना खूप आवडते तसेच पोटासाठी हेल्थी ठरते.