लोकल ग्रीन ब्रुशेटा
साहित्य: १ कप तांदुळसा/चवळीची बारीक चिरलेली भाजी, १ कप लाल राजगिऱ्याची बारीक चिरलेली भाजी, १ कप माठाची बारीक चिरलेली भाजी, १ कप पालकची बारीक चिरलेली भाजी, १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ लहान चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, १० ते १२ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, २ लहान चमचे काळीमिरी पूड, १ मोठा चमचा ओरिगॅनो हर्ब, चवीनुसार मीठ, १ मोठा चमचा बटर, १/२ कप लसुणी मेयोनीज (मेयोनीजमध्ये बारीक चिरलेला लसूण घालून एकत्र करून घ्या), २ कप किसलेले चीज, फ्रेंच ब्रेड लोफ स्लाइसेस.
कृती: एका गरम कढईत बटर व बारीक चिरलेला लसूण घाला.लसूण लालसर परतले, की हिरवी मिरची घाला.आता सगळ्या पालेभाज्या घालून छान परता.परतून कोरड्या झाल्यावर त्यात काळीमिरी पूड, ओरिगॅनो हर्ब, मीठ घालून एकजीव करा.हे भाज्यांचे मिश्रण थंड करा.फ्रेंच ब्रेड लोफस्लाइस घेऊन वरील बाजूस लसूणी मेयोनीज लावून घ्या.त्यावर हे पालेभाज्यांचे मिश्रण ठेवा.वरून किसलेले चीज घाला.आता हे ब्रुशेटा मंद आचेवर एका गरम तव्यावर ठेवा.पंधरा मिनिटांनंतर चीज मेल्ट होईपर्यंत झाकून ठेवा किंवा प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८०० तापमानावर पंधरा मिनिटे ठेवा.लोकल ग्रीन ब्रुशेटा गरम खायला तयार.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुप्रिता जोशी, पुणे