पालेभाज्यांची साटोरी
साहित्य॒: १ मेथीची जुडी, मिश्र भाजी (लाल माठ, पालक, मुळ्याचा कोवळा पाला, चवळी), १/२ लहान उकडलेला बटाटा, तीळ, खोबरे, शेंगदाणे कूट, आमचूर पावडर, साखर, मीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, हिंग, मिरी पावडर, चाट मसाला, तूप व तेल.
पारीसाठी॒: १ वाटी रवा, २ चमचे कणीक, २ चमचे तुपाचे मोहन, मीठ.
कृती॒: रवा साधारण बारीक करून घ्या व त्यात कणीक, मीठ, तुपाचे मोहन घालून भिजवून साधारण अर्धा तास बाजूला ठेवून द्या.
सारण॒: पालेभाज्या स्वच्छ धुऊन चिरा. तीळ, खोबरे भाजून बारीक वाटून घ्या. पॅनमध्ये एक चमचा तेल घालून भाज्या परता. जरा वाफ आल्यावर आले-लसूण-मिरची पेस्ट घाला. आता त्यात तीळ, खोबरे, दाण्याचे कूट घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. हिंग, आमचूर पावडर, मिरी पावडर, चाट मसाला, साखर, मीठ व किसलेला बटाटा घाला. त्यामुळे सारण मोकळे व मऊ राहते. सारण गार झाल्यावर भिजविलेल्या रव्याची पारी बनवून त्यात सारण भरा. मग ही पारी बंद करून पिठीवर लाटा. सारण साटोरीच्या कडेपर्यंत जाणे गरजेचे आहे. साटोरी तव्यावर भाजून जास्त तेलात परतून घ्या. गुलाबी रंग येईस्तोवर मस्त खमंग भाजा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
उल्का बोडस, बंगळुरू